Join us

भन्नाट! सलग तीन कसोटीत शतकांची हॅटट्रीक करणारा विराट पहिला कर्णधार

भारताची रनमशीन विराट कोहलीने सध्या चालू असलेल्या मालिकेत श्रीलंकन गोलंदाजांना पुरतं हतबल करुन टाकलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 17:13 IST

Open in App
ठळक मुद्देविराटचे घरच्या मैदानावरील दिल्लीच्या स्टेडियमवरील हे पहिल शतक आहे.

नवी दिल्ली - भारताची रनमशीन विराट कोहलीने सध्या चालू असलेल्या मालिकेत श्रीलंकन गोलंदाजांना पुरतं हतबल करुन टाकलं आहे. विराट श्रीलंकन गोलंदाजांना अक्षरक्ष कुटून काढतोय. तिस-या कसोटीत विराटने शनिवारी शानदार शतक झळकावलं. विराटच कसोटी क्रिकेटमधील हे 20 व शतक आहे. विराटने अवघ्या 110 चेंडूत शतकाला गवसणी घातली. 

विराटने वनडे क्रिकेटला साजेशा फलंदाजीचा नमुना दाखवला. त्याने शतकी खेळीत 14 चौकार लगावले. सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतकांची हॅटट्रीक करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. विराटने चालू मालिकेत सलग तीन कसोटी सामन्यात तीन शतक झळकावली आहेत. विराटने पहिल्या कोलकाता कसोटीच्या दुस-या डावात नाबाद 104 धावांची खेळी साकारली. नागपूर कसोटीच द्विशतकी 213 आणि दिल्लीच्या फिरोझ शहा कोटलावरही शतक झळकावलं. 

विराटचे घरच्या मैदानावरील दिल्लीच्या स्टेडियमवरील हे पहिल शतक आहे. विराटने आजच कसोटी क्रिकेटमधील 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा करणारा  तो पहिला खेळाडू बनला आहे. त्याने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा विराट चौथा भारतीय फलंदाज आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सुनिल गावसकर यांनी वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. विरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे.  अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे. विराटचा हा 63 वा कसोटी सामना असून त्याने 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतक झळकवली आहेत.  

टॅग्स :विराट कोहली