फखर झमानचे शतक व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

दक्षिण आफ्रिकेने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत पाहुण्या पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 05:30 AM2021-04-05T05:30:19+5:302021-04-05T05:30:36+5:30

whatsapp join usJoin us
Fakhar Zaman's 193 not enough for Pakistan as series level | फखर झमानचे शतक व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

फखर झमानचे शतक व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग : बावुमा (९२), डिकॉक (८०), डुसेन (६०) व मिलर (५०) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत पाहुण्या पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

पाकिस्तानतर्फे एकाकी झुंज देताना फखर झमानची (१९३ धावा, १५५ चेंडू, १८ चौकार, १० षटकार) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना फखर झमानची ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनच्या नावावर होता. त्याने बांगलादेशविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना १८५ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ६ बाद ३४१ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाकिस्तानचा डाव ९ बाद ३२४ धावांत रोखला. नॉर्खियाने ६३ धावांत ३ बळी घेत  महत्त्वाची भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ५० षटकांत ६ बाद ३४१ (बावुमा ९२, डिकॉक ८०, डुसेन ६०, मिलर नाबाद ५०, हॅरिस रौफ ३-५४, अश्रफ, हसनैन व शाहिन अफ्रिदी प्रत्येकी १ बळी) मात पाकिस्तान ५० षटकांत ९ बाद ३२४ (फखर झमान १९३, बाबर आजम ३१, एनरिच नॉर्खिया ३-६३)

Web Title: Fakhar Zaman's 193 not enough for Pakistan as series level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.