अर्जुन तेंडुलकर अन् सानिया चांडोक यांच्या व्हायरल फोटो मागची गोष्ट: खरंच हे साखपुड्याचे फोटो आहेत?

प्रसिद्ध उद्योगपतीची नात तेंडुलकर घराण्याची सून होणार ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:41 IST2025-08-14T19:39:31+5:302025-08-14T19:41:01+5:30

whatsapp join usJoin us
Fake Pictures Of Arjun Tendulkar And Saaniya Chandhok Fake Engagement Pics Goes Viral On Social Media Know About Real Truth Here | अर्जुन तेंडुलकर अन् सानिया चांडोक यांच्या व्हायरल फोटो मागची गोष्ट: खरंच हे साखपुड्याचे फोटो आहेत?

अर्जुन तेंडुलकर अन् सानिया चांडोक यांच्या व्हायरल फोटो मागची गोष्ट: खरंच हे साखपुड्याचे फोटो आहेत?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Arjun Tendulkar And Saaniya Chandhok Engagement : क्रिकेटच्या मैदानातील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि भारतीय क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याने सानिया चांडोक हिच्यासोबत साखरपुडा उरकल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबईत दोन्ही कुटुंबियातील अगदी जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत अगदी गुपचूप हा सोहळा पार पडला.  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची होणारी सून अब्जाधीशांच्या कुटुंबियात जन्मलेली आहेच. याशिवाय तिची एक स्वत:ची ओळखही आहे. सानिया ही वेटेरनरी टेक्निशअन आहे. मुंबईतील प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअरची ती मालकीण आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उद्योगपतीची नात तेंडुलकर घराण्याची सून होणार ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली अन्...

प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात तेंडुलकर घराण्याची सून होणार ही गोष्ट  वाऱ्यासारखी पसरली. ती काय करते? दोघांची भेट कशी झाली ही चर्चा रंगू लागली. पण दोन्ही कुटुंबियातील कुणीही याबद्दल अद्याप काहीच बोलले नाही. ना या कार्यक्रमातील फोटो शेअर केलेत. पण असे असतानाही अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक या दोघांचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो साखरपुड्यातील असल्याचा दावा करण्यात येतोय. पण त्यात तथ्य नसल्याची गोष्ट आता समोल आलीये.

सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?

अर्जुन-सानियाचे जोडीनं व्हायरल होणारे फोटो फेक 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचे दोन फोटो सर्वाधिक व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एका फोटोत अर्जुन तेंडुलकर हा सानियाच्या हातात अंगठी घालताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ही जोडी फोटोसाठी पोझ देताना दिसते. हे दोन्ही फोटो  साखरपुड्यातील आहेत, असा दावा करण्यात येतोय. पण ते खरं नाही.  हे फोटो AI च्या माध्यमातून तयार करुन व्हायरल करण्यात आले आहेत.

Web Title: Fake Pictures Of Arjun Tendulkar And Saaniya Chandhok Fake Engagement Pics Goes Viral On Social Media Know About Real Truth Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.