Join us

Faf du Plessis, IPL 2022: फॅफ ड्यू प्लेसिसची फटकेबाजी पाहून CSK चे फॅन्स 'सैराट' झाले; RCBच्या चाहत्यांनी मीम्सचा धुरळा उडवून ट्रोल केले!

फॅफ ड्यू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळी केली. त्याने ५७ चेंडूंत ८८ धावा चोपताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 23:08 IST

Open in App

फॅफ ड्यू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळी केली. त्याने ५७ चेंडूंत ८८ धावा चोपताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. फॅफच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBने २०५ धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला त्याने ३४ चेंडूंत केवळ २३ धावा केल्या होत्या, परंतु सेट झाल्यावर त्यानं तुफान फटकेबाजी केली. विराट कोहलीने २९ चेंडूंत नाबाद ४१ धावा केल्या.  दिनेश कार्तिकनेही १४ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या.  

फॅफ २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे. २०१६ व २०१७ या कालावधीत तो महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचा सदस्य होता. आयपीएल २०२१ मध्ये फॅफने १६ सामन्यांत ४५.२१च्या सरासरीने ६३३ धावा केल्या होत्या, तरीही CSK ने त्याला रिलीज केले. RCB ने ७ कोटी मोजून त्याला आपल्या संघात घेतले आणि कर्णधार बनवले.   फॅफ ड्यू प्लेसिसचे यश पाहून चेन्नई सुपर किंग्सचे चाहते सैराट झाले आणि RCBच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले.    

टॅग्स :आयपीएल २०२२एफ ड्यु प्लेसीसचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App