Join us

Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!

Shahid Afridi News: पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या निधनाची बातमी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:02 IST

Open in App

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या निधनाची बातमी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओने क्रिकेट जगताला हादरवून टाकले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहीद आफ्रिदीने जगाचा निरोप घेतला, असे सांगितले जात आहे. परंतु, याबाबत अधिक चौकशी केली असता हा व्हिडीओ एआयपासून तयार करण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर कराचीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांनीही शोक व्यक्त केल्याचा दावा या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु, याबाबत अधिक चौकशी केली असता हा व्हिडीओ एआयने बनवण्यात आल्याचे समजले. शाहिद आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्या मृत्युची बातमी खोटी आहे. 

शाहिद आफ्रिदीने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना त्याने ११ हजारांहून अधिक धावा केल्या. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ५४१ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकि‍र्दीत एकूण ३५१ षटकार मारल. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा या बाबतीत त्याच्यापासून फक्त ७ षटकार दूर आहे.

टॅग्स :फेक न्यूजशाहिद अफ्रिदीऑफ द फिल्ड