धनबाद : माजी कसोटी खेळाडू चेतन चौहान यांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताच्या १-४ अशा पराभवासाठी रविवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले, ‘शास्त्री यांना नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी या पदावरून दूर केले पाहिजे.’
चौहान हे शास्त्री यांना पदावरून दूर करण्याच्या मताचे आहेत. त्यांनी सांगितले, ‘शास्त्री यांना आॅस्ट्रेलिया दौºयाच्या आधी पदावरून दूर केले पाहिजे. शास्त्री चांगले समालोचक आहेत. त्यांना तेच काम दिले पाहिजे.’