Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजीत प्रयोगशीलतेचा लाभ झाला: शार्दुल ठाकूर

दिल्ली कॅपिटल्सचा  वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने पंजाब किंग्सविरुद्ध यशाचे श्रेय गोलंदाजीतील प्रयोगशीलतेला दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 08:34 IST

Open in App

नवी मुंबई :दिल्ली कॅपिटल्सचा  वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने पंजाब किंग्सविरुद्ध यशाचे श्रेय गोलंदाजीतील प्रयोगशीलतेला दिले आहे.  दिल्लीने १७ धावांनी विजय नोंदवून प्ले ऑफसाठी दावेदारी सादर केली आहे. 

या विजयात शार्दुलने सर्वोत्कृष्ट मारा करीत ३६ धावांत चार गडी बाद केले.  सामन्यानंतर शार्दुल म्हणाला, ‘मैदानाच्या दोन्ही भागांतील सीमारेषा लहान-मोठ्या होत्या. दव आणि उकाडा हे आव्हान होतेच. फलंदाज मोठी सीमारेषा असलेल्या भागात षट्कार मारतील, असे डोक्यात असल्याने  गोलंदाजीत विविधता राखून चेंडू टाकण्याची मी योजना आखली.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सशार्दुल ठाकूर
Open in App