Join us  

Suresh Raina परत येतोय! चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मैदानावर पुन्हा धुमशान घालणार

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य सुरेश रैना पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 11:11 AM

Open in App

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि काही क्षणातच सुरेश रैनानेही ( Suresh Raina) निवृत्तीचा मेसेज टाकला. धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK ) अजूनही खेळतोय, परंतु रैनाला आयपीएल लिलावात वाली न मिळाल्याने प्रथमच आयपीएलला मुकावे लागले. त्यानंतर Mr IPL रैनाने भारतातील सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून सन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. पण,आता सुरेश रैना पुन्हा मैदानावर धुमशान घालण्यासाठी सज्ज झाला आहे. सुरेश रैनाला मोठ्या संघाने करारबद्ध केले आहे आणि त्यामुळे रैनाच्या चाहत्यांचा आनंद द्वीगुणित झाला आहे.

रोहित शर्मा ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार नाही, Virat Kohli बाबतही मोठा निर्णय होणार!

रैनाने १८ कसोटी, २२६ वन डे व ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने अनुक्रमे ७६८ धावा, ५६१५ धावा व १६०५  धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६२ विकेट्सही आहेत.  रैनाने आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये ५५२९ धावा केल्या आहेत आणि ज्यात २ शतकं आणि ३८  अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने १०९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६८७१ धावा व ४१ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३०२ सामन्यांत ८०७८ धावा व ६४ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ३३६ सामन्यांत ८६५४ धावा व ५४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. 

अबु धाबी येथे होणाऱ्या T10 क्रिकेट लीगमध्ये सुरेश रैना खेळणार. गतविजेत्या डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने भारताच्या माजी खेळाडूला करारबद्ध केले आहे. २३ नोव्हेंबरपासून T10 लीगच्या पर्वाला सुरुवात होतेय आणि ८ संघांचा यामध्ये सहाभाग असणार आहे. ४ डिसेंबरला फायनल होईल. २०१७मध्ये पहिल्या T10 लीगचे आयोजन केले गेले होते आणि यंदाचे हे त्यांचे सहावे वर्ष आहे. ''वर्ल्ड कप विजेता सुरेश रैनाला डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने करारबद्ध केले आहे. तो पहिल्यांदाच T10 लीगमध्ये खेळणार आहे,''असे T10 लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले गेले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सभारतीय क्रिकेट संघटी-10 लीग
Open in App