Join us  

पती, पत्नी और 'वो'... स्वतःच्या लग्नातही नवदाम्पत्य वळून-वळून त्यांनाच पाहत होतं!

क्रिकेटच्या प्रेमापाई चाहत्यांनी अनेकदा अशा गोष्टी केल्यात की त्याची चर्चा रंगली... कधी सामना सुरू असताना सुरक्षाजाळी ओलांडून मैदानावर धाव घेतली, कधी संपूर्ण शरीरावर टॅटू काढले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 3:21 PM

Open in App

क्रिकेटच्या प्रेमापाई चाहत्यांनी अनेकदा अशा गोष्टी केल्यात की त्याची चर्चा रंगली... कधी सामना सुरू असताना सुरक्षाजाळी ओलांडून मैदानावर धाव घेतली, कधी संपूर्ण शरीरावर टॅटू काढले... पण, आज आपण अशाच एका चाहत्याला... क्रिकेडवेड्या जोडप्याला भेटणार आहोत. त्यांनी चक्क त्यांच्या लग्न समारंभाचा पारंपारिक सोहळा सोडून क्रिकेट सामना पाहण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला आलेले अतिथींनाही हसू आवरेना झालं. हे जोडपं अमेरिकेत राहणारे आहेत, यातीर नवऱ्या मुलाचे नाव हसन तस्लीम असं असून तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा जबरा फॅन आहे...

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्या दरम्यानचा हा किस्सा आहे. लग्नसमारंभ आटपून हे नव दाम्पत्य घरी परतले. त्यावेळी कुटुंबीयांसोबतच्या काही पारंपरिक रिती पार पाडल्या जात होत्या. पण, या दाम्पत्यानं घरी येताच टिव्ही ऑन केला आणि त्या रिती सोडून ते क्रिकेट सामनाच पाहत बसले...

स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली, पाकिस्ताननं शरणागती पत्करलीस्टीव्ह स्मिथच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या 6 बाद 150 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं दमदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं 7 विकेटनं हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला ऑसींनी चांगले धक्के दिले. फाखर जमान ( 2) आणि हॅरीस सोहैल ( 6) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद रिझवानने (14) काही काळ आझमसह संघाचा डाव सावरला. पण, त्याला अ‍ॅस्टन अ‍ॅगरने बाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या आसीफ अलीकडून आझमला अपेक्षा होत्या. मात्र, अवघे पाच चेंडूंत 4 धावा करून तो माघारी परतला. आसीफची विकेट गेल्यानंतर आझमही माघारी परतला. त्यानं 38 चेंडूंत 6 चौकारांसह 50 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या डायरेक्ट हिटनं आझमला माघारी पाठवले. त्यानंतर इफ्तियार अहमदनं 34 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत नाबाद 62 धावा करताना संघाला 6 बाद 150 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने धडाक्यात सुरुवात केली. त्यानं 11 चेंडूंत 4 चौकार लगावताना 20 धावा केल्या. पण, मोहम्मद आमीरनं त्याला त्रिफळाचीत केलं. कर्णधार अ‍ॅरोन फिंच ( 17)  मोहम्मद इरफानच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व बेन मॅकडेर्मोट या जोडीनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्मिथनं 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्मिथ व मॅकडेर्मोट जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. 22 चेंडूंत 21 धावा करून मॅकडेर्मोट माघारी परतला. स्मिथनं 51 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 80 धावा केल्या.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया