Join us  

रिटायरमेंट घेतल्यावरही या खेळाडूला पुन्हा भारतीय संघात यायचंय

एका मुलाखतीमध्ये आपल्याला भारताकडून खेळायचे असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:43 PM

Open in App

नवी दिल्ली : एकदा का तुम्ही रिटायरमेंट घेतली तर तुम्ही पुन्हा संघात येण्याचा विचार करू शकता का? पण भारताच्या एका खेळाडूने मात्र असा विचार करायला सुरुवात केली आहे. एका मुलाखतीमध्ये आपल्याला भारताकडून खेळायचे असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

 भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी 3 जुलैला जाहीर केला. अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. त्यामुळे रायुडूने निवृत्ती जाहीर केली होती. पण आता मात्र त्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळायचे आहे. 'स्पोर्ट्सस्टार'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रायुडूने हे वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. आता मला भारताबरोबर आयपीएलमध्येही खेळायचे आहे, असे रायुडू या मुलाखतीमध्ये म्हटल्याचे बोलले जात आहे. रायुडू सध्या तामिळनाडू येथे एक स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान रायुडूची मुलाखत घेतल्याचे म्हटले जात आहे.

विश्वचषकात धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. पण, अखेरीस त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला. 33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. 

रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे.

Image result for ambati rayudu in indian team

टॅग्स :अंबाती रायुडूरिषभ पंतशिखर धवन