Join us

European Championship Cricket : इंग्लंडच्या फलंदाजाला रोखण्यासाठी स्लिपमध्ये ८ खेळाडू; अजब फिल्डिंगची चर्चा, Video

प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला बाद करण्यासाठी स्लिपमध्ये १. २ नव्हे तर तब्बल ८ खेळाडूंना उभं केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेटचाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 19:55 IST

Open in App

सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर एका अजब फिल्डिंगची चर्चा रंगली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजाला बाद करण्यासाठी स्लिपमध्ये १. २ नव्हे तर तब्बल ८ खेळाडूंना उभं केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेटचाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. युरोपियन चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड एकादश विरुद्ध फिनलँड एकादश यांच्यातल्या सामन्यात हे अफलातून दृश्य पाहायला मिळाले. इंग्लंड एकादशनं हा सामना १४ धावांन जिंकला, परंतु त्याची फार चर्चा झालीच नाही.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा कर्णधार डॅन लिंकोल्न यानं २६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह ५६ धावा कुटल्या. त्याला अँडी रिस्टन ( २५) याची उत्तम साथ लाभली आणि त्यांनी ४ बाद ११३ धावा केल्या. फिनलँडच्या महेश तांबेनं २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात फिनलँडला १० षटकांत ६ बाद ९९ धावाच करता आल्या. मॅथ्यू जेनकिन्सन    नं ३९ धावा केल्या. 

पाहा भन्नाट फिल्डिंग...

टॅग्स :इंग्लंडफिनलंड
Open in App