नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली. इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 340 धावांचा डोंगर उभा केला आणि कोणीही न केलेला विक्रम नावावर केला. मात्र, चार तासांत त्यांच्या या पराक्रमाचे रुपांतर लाजीरवाण्या विक्रमात झाले.
पण, अवघ्या चार तासांत त्यांच्या या पराक्रमाचे रुपांतर लाजीरवाण्या विक्रमात झाले. जेसन रॉय ( 114), बेन स्टोक्स ( 71*), जेम्स व्हिंस ( 43), जो रूट ( 36) आणि टॉम कुरण ( 31) यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 3 विकेट व 3 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडच्या या विजयाने पाकिस्तानला लाजीरवाण्या विक्रमाचा सामना करावा लागला. 340+ धावा करूनही सलग तीन सामन्यांत पराभव पत्करणारा तो पहिलाच संघ ठरला. हा त्यांचा चौथ्या सर्वात मोठा पराभव ठरला.