बेयरेस्टो, मोईन अली यांना डच्चू, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा १३ सदस्यीय संघ जाहीर

या सामन्यासह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:47 IST2020-07-05T04:25:47+5:302020-07-05T06:47:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
England's 13-man squad for first Test against West Indies | बेयरेस्टो, मोईन अली यांना डच्चू, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा १३ सदस्यीय संघ जाहीर

बेयरेस्टो, मोईन अली यांना डच्चू, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा १३ सदस्यीय संघ जाहीर

लंडन : वेस्ट इंडिजविरुद्ध ८ जुलैपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने १३ सदस्यीय संघ शनिवारी जाहीर केला. यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेयरेस्टो आणि अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांना संघात स्थान मिळालेले नाही. या सामन्यासह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यानंतर आंतरराष्टÑीय क्रिकेट सुरू होत आहे. इंग्लंडने नऊ राखीव खेळाडूदेखील निवडले. ३२ वर्षांचा मोईन अली याने मागच्या सप्टेंबरमध्ये कसोटी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. त्याला २०१९-२० च्या केद्रीय करारात स्थान मिळाले नव्हते. मागच्या वर्षी अ‍ॅशेस मालिकेत अखेरची कसोटी खेळलेला मोईन अपयशी ठरला होता. न्यूझीलंडविरुद्ध  मालिकेतून देखील त्याला वगळण्यात आले होते. या सामन्यात ज्यो रुटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स पहिल्यांदा नेतृत्व करणार आहे.त्याने याआधी कुठल्याही सामन्यात नेतृत्व केलेले नाही. नियमित कर्णधार रुट हा या काळात दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी पत्नीसोबत राहणार आहे.(वृत्तसंस्था)

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अ‍ॅन्डरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (उपकर्णधार), जॅक क्राऊली, ज्यो डेनली, ओली पोप, डोम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
राखीव खेळाडू : जेम्स ब्रेसे, सॅम कुरेन, बेन फोक्स, डेन लॉरेन्स, जॅक लीच, शाकिब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, आॅली स्टोन.

तरी उत्साह कमी होणार नाही-पोप
साऊथम्पटन : विंडीजवरुद्ध ८ जुलैपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत उत्साह कमी होणार नसल्याचा आशावाद इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप याने व्यक्त केला.सरावानंतर २२ वर्षांचा पोप म्हणाला, ‘अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे हुरूप येतो हे खरे आहे. तथापि कोरोनामुळे प्रेक्षकांविना खेळावेच लागेल. एकही व्यक्ती नसेल तरी खेळाडूंचा उत्साह कमी होईल, असे वाटत नाही. खेळाडूंना अनेक परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो. प्रेक्षक नसले तरी कसोटीचा दर्जा कायम राहील.’

हेडिंग्लेतील विजयाची प्रेरणा घेत चांगली सुरुवात करू-सिमन्स

लंडन : इंग्लंडविरुद्ध मालिकेत सुरुवातीला पडझड होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल, असे सांगून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत चांगल्या सुरुवातीसाठी २०१७ च्या दौºयातील हेडिंग्ले येथे मिळालेल्या विजयापासून प्रेरणा घेत असल्याचे मत वेस्ट इंडिजचे कोच फिल सिमन्स यांनी शनिवारी व्यक्त केले.२०१७ च्या दौºयात बर्मिंघम कसोटीत इंग्लंडविरुद्ध सुरुवातीला झालेल्या पडझडीमुळे विंडीजने पहिली कसोटी एक डाव २०९ धावांनी गमावली होती. दुसºया कसोटीत मात्र पाहुण्या संघाने जोरदार मुसंडी मारताना ३२२ धावांचे लक्ष्य पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठले होते. ‘क्रिकेट आॅन द इनसाईड’ या वेबिनारमध्ये बोलताना सिमन्स म्हणाले, ‘हेडिंग्ले कसोटीतील विजयापासून आम्ही प्रेरणा घेत आहोत. मागच्या दौºयात पहिला सामना खराब ठरला होता. जगात जेथे कुठे खेळायला जातो तेथे पहिल्या सामन्यात अनेकदा असेच होते. असे पराभव टाळण्यासाठी सुरुवातीला होणारी पडझड थोपवणे हाच एकमेव पर्याय आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असलेल्या इंग्लंडविरुद्ध आमची झुंज असेल तेव्हा आघाडीवर राहून लढा द्यावा लागेल. हेडिंग्लेतील विजय आमच्यामध्ये उत्साहाचा संचार करणारा ठरेल.’ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात ८ जुलैपासून साऊथम्पटन मैदानावर जैवसुरक्षा वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: England's 13-man squad for first Test against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.