Ben Stokes Last ODI : इंग्लंडचा वर्ल्ड कप हिरो बेन स्टोक्स याने काल अखेरची वन डे लढत खेळली. इंग्लंडला पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता आणि त्याची अखेरची मॅच पाहण्यासाठी स्टेडियमनही फुल्ल होते. पण, इंग्लंडला वर्ल्ड कप नायकाला विजयी निरोप देता आला नाही. स्टोक्सला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही, तर 5 धावाच केल्या. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 62 धावांनी जिंकून मालिकात 1-0 अशी आघाडी घेतली. स्टेडियमसोडताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्टोक्सला निरोप दिला. स्टोक्सने चाहत्यांमध्ये उपस्थित असलेल्या एका चिमुरड्याला त्याची कॅप भेट म्हणून दिली आणि त्यावर त्याने स्वाक्षरीही केली होती. स्टोक्सने 105 वन डे सामन्यांत 3 शतकं व 21 अर्धशतकांसह 2924 धावा केल्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ben Stokes Last ODI : टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला
Ben Stokes Last ODI : टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला
Ben Stokes Last ODI : इंग्लंडचा वर्ल्ड कप हिरो बेन स्टोक्स याने काल अखेरची वन डे लढत खेळली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 12:25 IST