Join us

England vs West Indies 2nd Test : बेन स्टोक्सची तुफान फटकेबाजी; विंडीजसमोर 312 धावांचे लक्ष्य!

England vs West Indies 2nd Test इंग्लंडनं दुसऱ्या डावात स्टोक्सला सलामीला पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:51 IST

Open in App

इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सनं दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं विंडीजसमोर अखेरच्या दिवशी 312 धावांचे आव्हान उभे केले. इंग्लंडने दुसरा डाव 3 बाद 129 धावांवर घोषित केला. 

इंग्लंडनं पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला होता, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 287 धावांवर गडगडला. विंडीजनं फॉलोऑन टाळले तरी स्टोक्सच्या फटकेबाजीनं त्यांच्यावरील पराभवाचं संकट वाढवलं आहे. विंडीजकडून क्रेग ब्रॅथवेट ( 75), शॅमराह ब्रुक्स ( 68) आणि रोस्टन चेस ( 51) यांनी अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडनं दुसऱ्या डावात स्टोक्सला सलामीला पाठवलं आणि त्यानं 57 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 78 धावा चोपल्या. 

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजबेन स्टोक्स