Join us
Daily Top 2Weekly Top 5

England vs West Indies 1st Test: इंग्लंड कर्णधाराच्या जर्सीवर 'विकास कुमार' असे नाव; जाणून घ्या कारण

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 17:39 IST

Open in App

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा होत आहे. कोरोना व्हायरसमुळे जवळपास तीनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला नव्हता. 13 मार्चला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना झाला होता आणि त्यानंतर 117 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) कोरोना व्हायरसच्या संकटात नवीन नियम आणले आहेत, परंतु या सामन्यापूर्वी आणखी एक वेगळेपण पाहायला मिळालं. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या जर्सीवर वेगळंच नाव पाहायला मिळालं. ते नाव होतं डॉ. विकास कुमार यांचे.... स्टोक्सच्याच नव्हे, तर इंग्लंडच्या खेळाडूंच्या प्रत्येकाच्या जर्सीवर त्यांच्या नावाऐवजी वेगळीच नावं दिसत आहेत. 

मानलं भावा; एक पाय नसतानाही करतोय लै भारी फलंदाजी; 50 हजारवेळा पाहिला गेलाय Video

कोरोना व्हायरसच्या संकटातही क्रिकेटच्या पुनरागमनासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी ही शक्कल लढवली आहे. त्यांनी त्यांच्या जर्सीवर डॉक्टर्स, नर्स, शिक्षक आदींचा सन्मान म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची नावं लिहिली आहेत. खेळाडूच नव्हे तर इंग्लंडचे प्रशिक्षकही या महत्त्वांच्या व्यक्तींच्या नावची जर्सी घालून मैदानावर उतरले. स्थानिक क्रिकेट क्लब्सनी या व्यक्तींची नाव सुचवली आहेत. या सर्वांनी कोरोना व्हायरसच्या संकटात लोकांची अहोरात्र सेवा केलेली आहे.

 ''या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज आम्ही क्रिकेट खेळू शकत आहोत. त्यांनी या संकटकाळात जी देशसेवा केली आहे, त्याचे आम्ही ऋणी आहोत. त्यांचे नाव जर्सीवर घालणे, हा आमचा सन्मान आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचा हा आमच्याकडून छोटासा प्रयत्न,''असे स्टोक्स म्हणाला.   

अशी असतील नावं  ( खेळाडूंची नावं)एमिली ब्लॅकमोर, नर्स ( बेन फोक्स) डॉ. नासीर अली, क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल्सचे आप्तकालीन वैद्यकिय अधिकारी ( ऑली रॉबीन्सन) जो विथली, पॅरामेडीक ( जोफ्रा आर्चर)ऑली क्लार्स, NHS वॉलेंटियर ( जॅक लीच) सुजॅन बेनब्रीज, वॉलेंटियर ( मार्क वूड) ख्रिस टॉल, केअर होम वर्कर ( स्टुअर्ट ब्रॉड)  टॉम फिल्ड, नर्स ( जेम्स अँडरसन)  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्... 

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजबेन स्टोक्स