OMG : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास अन्....

England vs Pakistan, 2nd Test : चार षटक टाकल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडनं मागवला इनहेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:43 PM2020-08-14T15:43:42+5:302020-08-14T15:44:16+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 2nd Test : Stuart Broad looked in some sort of discomfort on the opening day of second Test | OMG : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास अन्....

OMG : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला जाणवला श्वसनाचा त्रास अन्....

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan, 2nd Test : यजमान इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानचा निम्मा संघ 126 धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं कसोटीची दणक्यात सुरूवात केली. पण, या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला श्वसनाचा त्रास झाला आणि त्यानं इनहेलर मागवला. 

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीतील शतकवीर शान मसूदला ( 1) जेम्स अँडरसननं तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले. अबीद अली ( 60) आणि कर्णधार अझर अली (20) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अँडरसननं पुन्हा एक धक्का दिला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरन आणि वोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेताना पहिल्या दिवशी पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 45.4 षटकांनंतर थांबवण्यात आला. फवाद चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.

ब्रॉडनं इनहेलर का मागवला?
इंग्लंडचा गोलंदाज ब्रॉडला दम्याचा त्रास आहे.. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्रास जाणवूनही ब्रॉडनं 13 षटकांत 4 निर्धाव षटकं फेकून 31 धावांत 1 विकेट घेतली. मागील चौदा वर्ष ब्रॉड अर्धा फुफ्फुसांसह खेळत आहे आणइ त्यानं कसोटीत 508 विकेट्स घेतल्या आहेत. अनेक वर्ष त्यानं दमा असल्याचे लपवून ठेवले होते. 2015मध्ये त्यानं पहिल्यांदा याबाबतचा खुलासा केला होता. ब्रॉडचा जन्म सहाव्या महिन्यात झाला आणि त्यामुळे त्याला एक पूर्ण आणि एक अर्धेच फुफ्फुस आहे. मरणाच्या दारातून तो परत आला आहे. त्याला दमा ही आहे आणि त्यामुळे तो नेहमी स्वतःजवळ इनहेलर ठेवतो. 

ब्रॉडच्या नावावर 140 सामन्यांत 500 विकेट्स झाल्या आहेत. कसोटीत 500 विकेट्स घेणारा तो 7 वा गोलंदाज ठरला आहे. अँडरसननं या पल्ला आधीच पार केला आहे आणि ब्रॉडच्या या विकेटनंतर एकाच संघातील दोन गोलंदाज हा विक्रम करणारी ही दुसरी जोडी ठरली. यापूर्वी 2000 साली वॉर्न आणि मॅकग्रा यांनी हा पराक्रम केला होता.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका) - 133 सामने व 800 विकेट्स
  • शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया) - 145 सामने व 708 विकेट्स
  • अनिल कुंबळे ( भारत) - 132 सामने व 619 विकेट्स
  • जेम्स अँडरसन ( इंग्लंड) - 153 सामने व 589 विकेट्स
  • ग्लेन मॅकग्रा ( ऑस्ट्रेलिया) - 124 सामने व 563 विकेट्स
  • कर्टनी वॉल्श ( वेस्ट इंडिज) - 132 सामने व 519 विकेट्स
  • स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) - 140 सामने व 500 विकेट्स

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

 

Read in English

Web Title: England vs Pakistan 2nd Test : Stuart Broad looked in some sort of discomfort on the opening day of second Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.