Join us  

England vs Pakistan, 2nd Test : 10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी खेळाडूला मिळाली पुनरागमनाची संधी

England vs Pakistan : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान संघाला मालिका विजयासाठी आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 3:39 PM

Open in App

England vs Pakistan : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान संघाला मालिका विजयासाठी आजपासून सुरू होणारी कसोटी जिंकावी लागणार आहे. पहिल्या कसोटीत डावात शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानला यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका वाचवण्यासाठी पाकिस्तानचा सर्व जोर लावावा लागणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी आपापले अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर करताच एक विक्रम समोर आला. या सामन्यात तब्बल 3911 दिवसांनी एका खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. 

ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज

पाहिल्या कसोटीत शान मसूदच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळून पाकिस्ताननं 107 धावांची आघाडी घेतली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही आणि पाकिस्तानला दुसऱ्या डावात 167 धावाच करता आल्या. त्यांनी इंग्लंडसमोर 277 धावांचं आव्हान उभं केलं. इंग्लंडचे 5 फलंदाज 117 धावांवर माघारी परतले होते, परंतु जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी शतकी भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं संघात दोन बदल केले. बेन स्टोक्स अन् जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडनं झॅक क्रॅवली अऩ् सॅम करनला संधी दिली. पाकिस्तानच्या संघात फवाद आलमला संधी देण्यात आली. त्यांनी शाबाद खानला संघातून वगळलं.   10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी त्यानं संघात पुनरागमन केलं. 24-28 नोव्हेंबर 2009 नंतर आलमनं पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन केलं.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?  

विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण 

Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान