Join us

ICC World Cup 2019 : वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती!

क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर झालेला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज होते आणि दोन्ही संघांनी तोडीततोड खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:43 IST

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर झालेला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज होते आणि दोन्ही संघांनी तोडीततोड खेळ केला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( आयसीसी) एक नियम आणि न्यूझीलंडच्या हातून निसटलेला सामना... क्रिकेटप्रेमी तो क्षण कधीच विसणार नाहीत. त्या नियमावरून बराच वादंग सुरू आहे. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या अखेरच्या षटकात धाव घेताना बेन स्टोक्सच्या बॅटला लागून गेलेला चौकार योग्य होता का? हा वर्ल्ड कप न्यूझीलंडचाच होता का?

इंग्लंडला अखेरच्या तीन चेंडूंत 9 धावांची गरज होती. बोल्टने टाकलेला फुलटॉस चेंडू बोल्टनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला. पण, मार्टिन गुप्तीलनं तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं फेकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्सच्या बॅटीला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला. कुमार धर्मसेनानं सहकारी पंचांशी चर्चा करून इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या. त्यानंतर हे समीकरण 2 चेंडूंत 3 धावा असे झाले आणि इंग्लंडने सामना बरोबरीत सोडवला.  

नियम काय सांगतो?आयसीसीच्या नियम 19.8 नुसार इंग्लंडला देण्यात आलेल्या सहा धावा या चुकीच्या ठरतात. त्यांना पाच धावा मिळायला हव्या होत्या. ओव्हर थ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण, थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा. या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुप्तीलने थ्रो केला त्यावेली स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभागही ओलांडलेला नव्हता. त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंडला पाचच धावा मिळायला हव्या होत्या. तसे झाले असते तर न्यूझीलंडने एका धावेने जेतेपद पटकावले असते. मग सुपर ओव्हर घेण्याचीही गरज भासली नसती. 

गुप्तीलनं थ्रो केला तेव्हा इंग्लंडचे फलंदाज कुठे होते, ते पाहा...

पाहा व्हिडीओ...

आयसीसीकडून देण्यात येणारा सर्वोत्तम अंपायरचा पुरस्कार पाचवेळा नावावर करणारे आणि मेरिलबन क्रिकेट क्लबच्या नियमांसंबंधित उपसमितीचे सदस्य सायमन टॉफेल यांनीही हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंड