Join us

England vs New Zealand 1st Test : पहिली कसोटी अनिर्णित, सिबलचे अर्धशतक, रुटची संयमी खेळी

England vs New Zealand 1st Test : यजमान संघ अखेरच्या सत्रात सामना अनिर्णित राखण्याच्या निर्धाराने खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७०  षटकांच्या खेळात पहिल्या डावातील शतकवीर सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स (२५) व जॅक क्राऊली (०२) यांच्या विकेट गमावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 05:21 IST

Open in App

लंडन : न्यूझीलंडने दिलेल्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने रविवारी पाचव्या व शेवटच्या दिवशी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने टॉम सिबल याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ७० षटकांत ३ बाद १७० धावा केल्या होत्या. या सामन्यात तिसरा दिवस पावसाने वाया गेला. तसेच पाचव्या दिवशीदेखील पावसाचा व्यत्यय आला होता. यजमान संघ अखेरच्या सत्रात सामना अनिर्णित राखण्याच्या निर्धाराने खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७०  षटकांच्या खेळात पहिल्या डावातील शतकवीर सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स (२५) व जॅक क्राऊली (०२) यांच्या विकेट गमावल्या.  इंग्लंड़चा डॉम सिबल याने नाबाद ६० धावा केल्या. तर ज्यो रुट याने ४० धावा केल्या. त्याला नील वॅगनर याने पाचयीत केले.इंग्लंडतर्फे पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने दुसऱ्या डावात २६ धावांत ३ बळी घेतले. 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंड