Join us

कपिलदेवचा रेकॉर्ड मोडण्यास हिटमॅन सज्ज

Rohit Sharma: भारताचे माजी कर्णधार  कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:35 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देव यांचा एक विक्रम खुणावत आहे. 

भारताचे माजी कर्णधार  कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. 

 हा विक्रम मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ एका षटकाराची गरज आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी षटकार ठोकणाऱ्यांमध्ये कपिलदेव चौथ्या स्थानी आहेत. भारताकडून सर्वाधिक ९१ षटकार विरेंद्र सेहवागने मारले आहेत.

सर्वाधिक कसोटी षटकार मारणारे भारतीय फलंदाजविरेंद्र सेहवाग 91महेंद्रसिंग धोनी 78सचिन तेंडुलकर ६९कपिल देव  ६१

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मा
Open in App