कपिलदेवचा रेकॉर्ड मोडण्यास हिटमॅन सज्ज

Rohit Sharma: भारताचे माजी कर्णधार  कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:35 IST2021-08-24T05:35:07+5:302021-08-24T05:35:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
England vs India: Hitman Rohit Sharma ready to break Kapil Dev's record | कपिलदेवचा रेकॉर्ड मोडण्यास हिटमॅन सज्ज

कपिलदेवचा रेकॉर्ड मोडण्यास हिटमॅन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देव यांचा एक विक्रम खुणावत आहे. 

भारताचे माजी कर्णधार  कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. 

 हा विक्रम मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ एका षटकाराची गरज आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी षटकार ठोकणाऱ्यांमध्ये कपिलदेव चौथ्या स्थानी आहेत. भारताकडून सर्वाधिक ९१ षटकार विरेंद्र सेहवागने मारले आहेत.

सर्वाधिक कसोटी षटकार मारणारे भारतीय फलंदाज
विरेंद्र सेहवाग 91
महेंद्रसिंग धोनी 78
सचिन तेंडुलकर ६९
कपिल देव  ६१

Web Title: England vs India: Hitman Rohit Sharma ready to break Kapil Dev's record