England vs India, 5th Test : पाचव्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला प्रिसद्ध कृष्णानं आपलं षटक पूर्ण केल्यावर मोहम्मद सिराजनं पहिल्याच षटकात इंग्लंडचा विकेट किपर बॅटर जेमी स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या जागी आलेला गस ॲटकिन्सन हा देखील पहिल्याच चेंडूवर फसला होता. पण केएल राहुलनं दुसऱ्या स्लिपमध्ये त्याच्या कॅचची संधी सोडली. त्यानंतर सिराजनं दुसऱ्या षटकात ओव्हरटनच्या रुपात आणखी एक विकेट घेत इंग्लंडचं टेन्शन वाढवत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.
मग मोहम्मद सिराज पिक्चरमध्ये आला. इंग्लंडच्या डावातील ७८ व्या षटकात सिराजनं पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यावर जेमी स्मिथला ध्रुव जुरेलकरीव झेलबाद केले. तो २० चेंडूत २ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या गस ॲटकिन्स यालाही सिराजनं अप्रतिम चेंडू टाकला. बॅटची कड घेऊन चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये गेला. पण केएल राहुल या संधीचं सोन करण्यात अपयशी ठरला. ही संधी हुकल्यावर जेमी ओव्हरटनच्या रुपात सिराजनं दुसऱ्या षटकात आणखी एक विकेट घेत सामन्यातील रंगत आणखी वाढवली.