IND vs ENG, 5th Test Day 2, England All Out 247 1st Innings : मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात २४७ धावांवर रोखले आहे. यजमान संघाला या सामन्यात २३ धावांची अल्प आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाला पहिल्या डावात २२४ धावांत ऑल आउट केल्यावर इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळे इंग्लंडचा संघ या सामन्यात भक्कम आघाडी मिळवेल, असे वाटत होते. पण सिराजचं मॅजिक अन् प्रसिद्ध कृष्णाचा जलवा दिसला अन् इंग्लंडचा पहिला डाव आटोपत दुसऱ्या दिवसाच्या खेळातच भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या सलामीवीरांची जबरदस्त सलामी, पण...
सलामीवीर झॅक क्रॉउलीचं अर्धशतक आणि बेन डकेटनं त्याला दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावाची सुरुवात दमदार केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. बेन डकेटची ३८ (४३) विकेट घेत आकाश दीपनं ही जोडी फोडत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णानं झॅक क्रॉउलीला ६४ (५७) तंबूत धाडले अन् मग मिया मँजिक पाहायला मिळाले.
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
मियाँ मॅजिक अन् प्रसिद्ध कृष्णाचा जलवा
मोहम्मद सिराजनं इंग्लंडचा कर्णधार ओली पोप २२ (४४) आणि जो रुटची २९ (४५) महत्त्वपूर्ण विकेट घेतली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर जेकब बेथेलही ६ (१४) त्याच्या जाळ्यात अडकला. प्रसिद्ध कृष्णा इंग्लंडला ठरविक अंतराने धक्के देत जेमी स्मिथ ८ (२२), जेमी ओव्हरटन ०(४) आणि गस ॲटकिन्सन ११ (१६) यांना तंबूत धाडले. हॅरी ब्रूकच्या रुपात मोहम्मद सिराजनं इंग्लंडच्या संघाला २४७ धावांवर ९ वा धक्का दिला. क्रिस वोक्स दुखापतीमुळे मॅचमधून आउट झाला असल्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २३ धावांच्या अल्प आघाडीसह आटोपला.