England vs India, 2nd Test Day 3 : बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थिती आकाश दीपनं संधीचं सोनं केल्यावर मोहम्मद सिराजनंही आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिलीये. पहिल्या कसोटी सामन्यात विकेट्स घेण्यात कमी पडलेल्या सिराजनं तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच सत्रात एकाच षटकात २ चेंडूवर २ विकेट्स घेत इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. सेट झालेल्या जो रुटसह त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स खातेही न उघडता तंबूत परतला. भारतीय संघाने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ८४ धावांवर इंंग्लडचा अर्धा संघ तंबूत परतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजच्या गोलंदाजीत
दुसऱ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराजनं जॅक क्रॉउलीच्या रुपात बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली होती. तिसऱ्या दिवसातील आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर जो रुट त्याच्या जाळ्यात फसला. लेग साइडच्या दिशेनं विकेट मागे जाणाऱ्या चेंडू मारण्याच्या नादात तो फसला. जो रुटनं ४६ चेंडूत २२ धावांची खेळी केली.
IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?
कॅप्टनच्या रुपात इंग्लंडच्या तिसरा गड्याच्या पदरी पडला भोपळा
जो रुटची विकेट गमावल्यावर बेन स्टोक्स मैदानात आला. त्याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण सिराजसमोर त्याचा निभाव काही लागला नाही. बेन स्टोक्सला परफेक्ट बाउन्सरचा मारा करत सिराजनं त्याला आल्या पावली माघारी धाडले. बेन डकेट, ओली पोप यांच्यानंतर पहिल्या डावात इंग्लंडच्या कॅप्टनवरही शून्यावर तंबूत परतण्याची नामुष्की ओढावली.
... अन् सिराजसाठी धोक्याची घंटा वाजली
दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यावर आकाश दीपची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याने इंग्लंडच्या संघाला एकाच षटकात दोन धक्के दिले होते. त्याची ही कामगिरी सिराजला जोर लावायला भाग पाडणारी होती. कारण जर या सामन्यात विकेट मिळाली नसती तर तिसऱ्या कसोटी सामन्यात कदाचित त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली असती. पण तीन विकेट्स घेत त्यांना तुर्तास तरी हा धोका टाळल्याचे दिसते.