England vs India, 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात तीन बदलासह मैदानात उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि नीतीश कुमार रेड्डी या दोन अष्टपैलूंवर टीम इंडियानं भरवसा दाखवला आहे.
टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा?
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगला संधी मिळेल अशी आशा होती. पण टीम इंडियाने आकाश दीपला पसंती दिलीये. एवढेच नाही तर फिरकीच्या रुपात कुलदीप यादव हा सर्वोत्तम पर्याय ठरला असता. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर अन् नितीश कुमार रेड्डी यांची टीम इंडियात झालेली एन्ट्री शुबमन गिलच्या संघाला आपल्या बॅटिंग ऑर्डरवर विश्वास नसल्याचे चित्र निर्माण करणारी असून प्लेइंग इलेव्हनमधील हे बदल टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात बचावात्मक पवित्रा घेतल्याचे चित्र निर्माण करणारे आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन -
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन -
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर