बर्मिंगहॅमच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी पावसाने बॅटिंग केली. पण पावसाने बॅटिंग थांबवल्यावर लगेच आकाश दीपनं भेदक माऱ्यासह इंग्लंडवर हमला सुरु केला. पाचव्या दिवसाच्या खेळातील आपल्या दुसऱ्याच षटकात आकाश दीपनं ओली पोपला बोल्ड केले. त्यानंतर वैयक्तिक तिसऱ्या षटकात त्याने कमालीच्या इनस्विंगवर हॅरी बूकलाही चालते केले. बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत भारतीय संघाने खेळ सुरु झाल्यावर इंग्लंडची अवस्था ८३ धावांवर ५ विकेट्स अशी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून आता फक्त ५ विकेट्स दूर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आकाश दीपचा जलवा, बॅक टू बॅक ओव्हरमध्ये इंग्लंडला धक्यावर धक्का
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील २० व्या षटकात आकाश दीपनं ओली पॉपला आपल्या जाळ्यात अडकवले. आकाशदीपनं टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपवर आदळला अन् ५० चेंडूत २४ धावांवर ओली पोपचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर पुढच्या षटकात आकाश दीपनं हॅरी बूकलाही तंबूचा रस्ता दाखवला. ३१ चेंडूत २३ धावांवर तो पायचित झाला.