पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:50 IST2025-07-06T17:46:36+5:302025-07-06T17:50:24+5:30

whatsapp join usJoin us
England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over | पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅमच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी पावसाने बॅटिंग केली. पण पावसाने बॅटिंग थांबवल्यावर लगेच आकाश दीपनं भेदक माऱ्यासह इंग्लंडवर हमला सुरु केला. पाचव्या दिवसाच्या खेळातील आपल्या दुसऱ्याच षटकात आकाश दीपनं ओली पोपला बोल्ड केले. त्यानंतर वैयक्तिक तिसऱ्या षटकात त्याने कमालीच्या इनस्विंगवर हॅरी बूकलाही चालते केले. बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत भारतीय संघाने खेळ सुरु झाल्यावर इंग्लंडची अवस्था ८३ धावांवर ५ विकेट्स अशी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून आता फक्त ५ विकेट्स दूर आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आकाश दीपचा जलवा, बॅक टू बॅक ओव्हरमध्ये इंग्लंडला धक्यावर धक्का

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील २० व्या षटकात आकाश दीपनं ओली पॉपला आपल्या जाळ्यात अडकवले. आकाशदीपनं टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपवर आदळला अन्  ५० चेंडूत २४ धावांवर ओली पोपचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर पुढच्या षटकात आकाश दीपनं हॅरी बूकलाही तंबूचा रस्ता दाखवला. ३१ चेंडूत २३ धावांवर तो पायचित झाला.

इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

बर्मिंगहॅमच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर ६०८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने चौथ्या दिवसाअखेर ७२ धावांवर आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने इंग्लंडला धक्क्यावर धक्के देत बर्मिंगहॅमच्या मैदानातील ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं आणखी दोन पावले टाकली आहेत.  पाचव्या दिवसाच्या खेळात  ५३६ धावांची गरज असताना पहिल्या सत्रातील अर्ध्या तासात इंग्लंडच्या संघाने २ विकेट्स गमावल्या. ८३ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला. भारतीय संघाने सामन्यावरील पकड आणखी मजबूत करत   सामना वाचवण्याचे इंग्लंडचे टाक्स आणखी  मुश्कील केल्याचे दिसते. 

Web Title: England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.