Join us

ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

इंग्लंडला धक्क्यावर धक्के, या दोघांनाही उघडता आले नाही खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 22:27 IST

Open in App

ENG vs IND 2nd Test Akash Deep Takes 2 Wicket In 2 Balls :  बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारल्यावर गोलंदाजीतही भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. आकाश दीपनं दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीत कोण धमक दाखवणार? हा प्रश्न चर्चेत असताना आकाश दीपनं "मैं हूँ ना.." शो दाखवत इंग्लंडच्या आघाडीच्या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहिल्या डावातील तिसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आकाश दीपनं हेडिंग्लेच्या मैदानातील शतकवीर बेन डकेट याला आपल्या जाळ्यात अडकवले. ५ चेंडूचा सामना करून तो कर्णधार शुबमन गिलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आली नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपलाही आकाश दीपनं केएल राहुलकरवी झेलबाद केले. तिसऱ्या षटकात १३ धावांवर इंग्लंडच्या संघाने आपल्या दोन्ही विकेट्स गमावल्या.  

पहिल्या षटकात धुलाई,  मग आकाश दीपनं  २ चेंडूत घेतल्या २ विकेट्स

दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव ५८७ धावांवर आटोपल्यावर झॅक क्रॉउली आणि बेन डकेट या जोडीनं इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या आकाश दीपनं भारताकडून पहिले षटक घेऊन आला. झॅक क्रॉउलीनं पहिल्याच षटकात दोन खणखणीत चौकार ठोकत या षटकात १२ धावा कुटल्या. सिराजनं दुसरे षटकात नो बॉलच्या रुपात एक धाव खर्च केली अन् इंग्लंडच्या संघाने दोन षटकानंतर धावफलकावर १३ धावा लावल्या. संघाकडून तिसरं आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेल्या आकाश दीपनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना बेन डकेटला आपल्या जाळ्यात अडकले. शुबमन गिलनं स्लिपमध्ये डाव्या बाजूला झुकत एक अप्रतिम झेल टिपला अन् भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपला आकाश दीपनं आपल्या पावली माघारी धाडलं. तो लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन परतला. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडआकाश दीप