England vs India 1st Test Day 3 Stumps : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात ९० धावा करत ९६ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी लोकेश राहुल ७५ चेंडूचा सामना करून ४७ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला शुबमन गिल १० चेंडूत ६ धावांवर नाबाद खेळत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकवीर यशस्वी दुसऱ्या डावात स्वस्तात फिरला माघारी
इंग्लंडच्या संघाचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपल्यावर यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर अवघ्या १६ धावा असताना ब्रायडन कार्स याने यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. एका अप्रतिम आउट स्विंग चेंडुवर शतकवीर यशस्वी जैस्वालला झेलबाद होऊन ४ धावांवर माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या आणि पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या साई सुदर्शन याने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. ही खेळी मोठी करण्यात तो अपयशी ठरला.
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
साई सुदर्शन पुन्हा स्टोक्सच्या जाळ्यात फसला
साई सुदर्शन याने दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलच्या साथीनं ६६ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट झालीये असे वाटत असताना बेन स्टोक्सच्या चेंडूवर साईनं आपली विकेट गमावली. ४८ चेंडूचा सामना करून तोही ३० धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. पहिल्या डावातही त्यानेच साई सुदर्शनची विकेट घेतली होती.
आता केएल राहुल अन् शुबमन गिलवर असतील नजरा
पहिल्या डावात भारतीय संघाने फलंदाजीत चमक दाखवली. लोकेश राहुलनं संघाला दमदार सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता दुसऱ्या डावात त्याच्यावर मोठ्या खेळीसह भारतीय संघाला मजबूत स्थितीत घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात पहिल्या १५-२० षटकांच्या खेळात त्याचा अनुभव टीम इंडियासाठी खूपच मोलाचा ठरेल. दुसऱ्या बाजूला पहिल्या डावातील शतकवीर शुबमन गिलवरही सर्वांच्या नजरा असतील.
Web Title: England vs India 1st Test Day 3 Stumps India lead by 96 runs All Eyes On KL Rahul And Shubman Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.