England U19 vs India U19, 3rd Youth ODI Vaibhav Suryavanshi New Record : IPL मध्ये धुमाकूळ घातल्यावर १४ वर्षीय वैभव सूर्यंवशी आता इंग्लंडमध्ये मैदान गाजवताना दिसतोय. भारत-इंग्लंड यांच्यातील अंडर १९ यूथ वनडे स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात त्याने धमाकेदार खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक हुकल्यावर तिसऱ्या सामन्यात त्याने हा टप्पा पार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय अंडर १९ संघाकडून डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यंवशीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ३१ चेंडूत त्याने ८६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकारांसह ९ षटकार मारत खास विक्रम सेट केला. तो आता अंडर १९ यूथ वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड संयुक्तरित्या राज बावा आणि मनदीप सिंग यांच्या नावे होता. दोघांनी प्रत्येकी ८-८ षटकार मारले होते.
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
अंडर-१९ वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज
- ९ - वैभव सूर्यवंशी विरुद्ध इंग्लंड U19, नॉर्थम्प्टन, २०२५
- ८ - राज बावा विरुद्ध युगांडा U19, तरौबा, २०२२
- ८ - मनदीप सिंग विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19, होबार्ट, २००९
दुसरे सर्वात जलद अर्धशतक
वैभव सूर्यंवशीनं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अवघ्या २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. हे अंडर १९ वनडेतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. अंडर १९ मध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम हा रिषभ पंतच्या नावे आहे. त्याने २०१६ मध्ये नेपाळ विरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
इंग्लंडमध्ये युवा टीम इंडियाचा जलवा
यूथ वनडेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्यावर यजमान इंग्लंड संघाने दुसरा सामना जिंकत पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. पण आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४०-४० षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंड अंडर १९ संघाने दिलेल्या २६८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४ विकेट्स राखून सामना जिंकलाय
Web Title: England U19 vs India U19 3rd Youth ODI Vaibhav Suryavanshi Creates History With Slams 86 Runs From 31 Balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.