England T20 World Cup Squad : भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. पण या संघातून मॅच विनर खेळाडूला वगळण्यात आले आहे. IPL लिलावात काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने ज्या खेळाडूसाठी १३ कोटी मोजले तो इंग्लंडच्या संघाला वर्ल्ड कपसाठी पात्र वाटत नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो लियाम लिविंगस्टोन आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लियाम लिविंगस्टोन याला टी २० वर्ल्ड कप संघातून का वगळलं?
लियाम लिविंगस्टोन हा सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा अनुभवी खेळाडू आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला आहे. संघातील त्याची भूमिकाही स्पष्ट नव्हती. फलंदाजीत त्याला संघ व्यवस्थापनाने वरच्या क्रमांकावर आणि खालच्या क्रमांकावर आजमावले. पण तो आपले स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने अनुभवापेक्षा युवा खेळाडूंना पसंती दिली आहे. विल जॅक्स आणि जॅक बेथेल यांसारख्या तरुण खेळाडूंना संधी दिल्यामुळे त्याचा पत्ता कट झाला.
T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी श्रीलंकन बोर्डाचा अजब-गजब फंडा! मलिंगाला कोच केलं, पण...
IPL 2026 च्या मिनी लिलावात लागली होती १३ कोटींची बोली
लियाम लिविंगस्टोन हा IPL 2026 च्या मिनी लिलावात आधी अनसोल्ड राहिला. पण त्यानंतरच्या फेरीत त्याला संघात घेण्यासाठी IPL फ्रँचायझींमध्ये कमालीची चढाओढ पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने त्याला संघात घेण्यासाठी बोली लावली. पण फायनली १३ कोटी एवढी मोठी रक्कम मोजत काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते.
लियाम लिविंगस्टोनची T20I मधील कामगिरी
लियाम लिविंगस्टोन याने ६० टी-२० सामन्यातील ४७ डावात १४८.९९ च्या सरासरीसह ९५५ धावा केल्या आहेत. १०३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सामन्याला कलाटणी देण्याी क्षमता असणाऱ्या या खेळाडूच्या नावे फक्त २ अर्धशतकांची नोंद आहे.
टी-२० वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संभाव्य संघ
हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर, जोफ्रा आर्चर, सॅम करन, आदिल राशीद,ख्रिस वोक्स, फिल सॉल्ट,विल जॅक्स,बेन डकेट,रेहान अहमद, लियाम डॉसन,जेमी ओव्हरटन,जोश टंग,ल्यूक वुड,जेकब बेथेल.
Web Summary : Liam Livingstone, bought for ₹13 crore in IPL, was dropped from England's T20 World Cup squad due to inconsistent performance and team preferring young players. Will Jacks and Jack Bethell got selected instead.
Web Summary : आईपीएल में 13 करोड़ में बिके लियाम लिविंगस्टोन को इंग्लैंड की टी20 विश्व कप टीम से खराब प्रदर्शन और युवा खिलाड़ियों को तरजीह के कारण बाहर कर दिया गया। विल जैक्स और जैक बेथेल को चुना गया।