Join us
Daily Top 2Weekly Top 5

190 धावा कुटणारा फलंदाज इंग्लंडच्या चमूत, पाकच्या ताफ्यात चिंता

इंग्लंडने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या वन डे आणि पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20  सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 14:28 IST

Open in App

लंडन : इंग्लंडने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या वन डे आणि पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20  सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. नॉटिंगहॅमशायरचा बेन डकेट आणि मिडलेसेक्सचा डेवीन मलान यांना संघात स्थान देण्यात आले आहे. शिवाय पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हॅम्पशायरच्या जेम्स व्हिंसची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्ध वन डे आणि पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20  सामन्यातील संघात व्हिंसचा आधीच समावेश होता. ग्लोसेस्टरशायर संघाविरुद्ध व्हिंसने 154 चेंडूंत 190 धावांची वादळी खेळी केली होती आणि त्यामुळेच वन डे संघात त्याची वर्णी लागली.सरेचा फलंदाज जेसन रॉयने पाठीच्या दुखण्यामुळे आयर्लंड व पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांतून माघार घेतली आहे. पण, तो पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत संघाचा सदस्य असणार आहे.   आयर्लंड वन डे व पाकिस्तान ट्वेंटी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघइयॉन मॉर्गन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन, जो डेन्ली, बेन डकेट, बेन फोक्स, ख्रिस जॉर्डन, डेवीड मलान, लिएम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेम्स व्हिंस, डेव्हिड विली.

पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीचा इंग्लंड संघइयॉन मॉर्गन, मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम कुरन, जो डेन्ली, ख्रिस जॉर्डन, लिएम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स व्हिंस, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानआयर्लंड