Join us  

पाकिस्तानचा संघ इंग्लंडला भिडणार, पण पाक चाहते सामने नाही पाहू शकणार; भारताकडे बोट दाखवत मंत्र्यांनी घेतला निर्णय 

पाकिस्तानाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतु या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये होऊ शकणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:11 PM

Open in App

पाकिस्तानाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतु या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये होऊ शकणार नाही. या मालिकेच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क भारतीय कंपनीकडे आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी भारतासोबत कोणतेही व्यावसायिक संबंध ठेवायचे नसल्याचं स्पष्ट करताना पाकिस्तानात या मालिकेचं थेट प्रक्षेपण होणार नाही, हे जाहीर केलं. ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी

दक्षिण आशियातील क्रिकेट मालिकेच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क भारतीय कंपनीकडे आहेत. इस्लामाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चौधरी यांनी सांगितले की, पाकिस्तान टेलेव्हिजन कॉर्पोरेशननं नुकतीच आम्हाला स्टार सोबत करार करण्याची विनंती केली. स्टारकडे पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याच्या मालिकेच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क आहेत. पण, त्यांची ही विनंती अमान्य करण्यात आली. जोपर्यंत भारत सरकारनं 5 ऑगस्ट 2019मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतलेला निर्णय बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतेही व्यावसायिक संबंध ठेवले जाणार नाही.  जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

चौधरी पुढे म्हणाले, भारतीय कंपनीकडे या मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत आणि भारतासोबत कोणताही व्यावसायिक संबंध ठेवण्याची आमची इच्छा नाही.  5 ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हे संबंध असेच राहतील. 

इंग्लंड-पाकिस्तान मालिकेचे प्रक्षेपण होणार नसल्यानं पाकिस्तान टेलेव्हिजन कॉर्पोरेशनला मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचेही त्यांनी मान्य केलं. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 8 जुलैपासून या मालिकेला सुरूवात होईल.   

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड