मॅन्चेस्टर : तळाचे फलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ंच्या (६२) झटपट फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ३६९ पर्यंत मजल गाठली.
प्रत्युत्तरात दुसºया दिवशी चहापानापर्यंत विंडीजने २५ षटकात ५९ धावात ३ फलंदाज गमावले. हा संघ इंग्लंडच्या तुलनेत ३१० धावांनी मागे असून ७ फलंदाज शिल्लक आहेत.
इंग्लंडच्या डावात ब्रॉडसह ओली पोप (९१) रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने सर्वाधिक चार गडी बाद केले. दहाव्या स्थानावर आलेल्या ब्रॉडने वेगवान फटके मारले. त्याने नऊ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक गाठले. डोमिनिक बेस याची ब्रॉडला साथ लाभल्याने दोघांनी संघाच्या ३५० धावा फळ्यावर लावल्या.
त्याआधी यजमान संघाने कालच्या ४ बाद २५८ वरून दुसºया दिवसाचा खेळ सुरू केला. ९१ धावांवर नाबाद असलेला पोप एकही धाव न करता शॅनन गॅब्रियलच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. कालचा दुसरा नाबाद फलंदाज जोस बटलरची (६७) दांडी गॅब्रियलनेच गूल केली. (वृत्तसंस्था)
जैव सुरक्षा व्यवस्थेत वास्तव्य आव्हानात्मक - पोप
मॅन्चेस्टर : जैव सुरक्षा व्यवस्थेत वास्तव्य करणे आव्हानात्मक असल्याचे मत इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप याने व्यक्त केले. २२ वर्षांच्या पोपने तिसºया सामन्यात ९१ धावा केल्या. याआधी दोन्ही सामन्यात तो अपयशी ठरला होता. शॅनन गॅब्रियलच्या चेंडूवर त्रिफळाबाद होताच दुसºया कसोटी शतकास मुकलेला पोप स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी बोलताना म्हणाला,‘जैव सुरक्षा व्यवस्थेमुळे निवासाची खोली आणि मैदान इतकेच विश्व असते. कुटुंबाला देखील पाहता येत नाही. कुटुंबाला पाहू न शकल्याचा फटका मलाही बसला तथापि या कठीण समयी सहकाऱ्यांनी एकमेकांना साथ दिली. मानसिकरीत्या त्रस्त झालो तरी सहकारी एकमेकांना धीर देतात, ही बाब आमच्यासाठी मोलाची ठरली.’
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव: १११.५ षटकात सर्वबाद ३६९ (कालच्या ४ बाद २५८ वरून पुढे) ओली पोप ९१, जोस बटलर ६७,रोरी बर्न्स ५७,स्टुअर्ट ब्रॉड ६२. गोलंदाजी: केमार रोच ४/७२, शॅनन गॅब्रियल २/७७,रोस्टन चेस २/३६,जेसन होल्डर १/८३.
वेस्ट इंडिज पहिला डाव : २५ षटकात ३ बाद ५९. ब्रेथवेट १, कॅम्पबेल ३२, शाय होप १७. गोलंदाजी: स्टुअर्ट ब्रॉड १/१३,जेम्स अॅन्डरसन १/१३,जोफ्रा आर्चर १/१६.