Join us

इंग्लंडची विजयाकडे वाटचाल;वेस्ट इंडिजची घसरगुंडी, दुसऱ्या डावात ४ बाद १०८ धावा

विंडीजला अद्याप २०४ धावांची गरज असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक असल्याने इंग्लंडने विजयाकडे वाटचाल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:35 IST

Open in App

मॅन्चेस्टर : विजयासाठी ३१२ धावांचा पाठलाग करणाºया वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सोमवारी उपहारानंतर ३७ षटकात १०८ धावात ४ गडी गमावले. विंडीजला अद्याप २०४ धावांची गरज असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक असल्याने इंग्लंडने विजयाकडे वाटचाल केली आहे.

त्याआधी, अष्टपैलू बेन स्टोक्स याने अवघ्या ५७ चेंडूत नाबाद ७८ धावांचा झंझावात करताच पहिल्या डावात ४६९ धावा उभारणाºया यजमान इंग्लंडने दुसरा डाव ३ बाद १२९ असा घोषित केला. पहिझल्या डावात २८७ धावा करणाºया वेस्ट इंडिजला ८५ षटकात ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले.

पहिली कसोटी विंडीजने जिंकली होती. सोमवारी इंग्लंडने ११ षटकांच्या फलंदाजीत ९२ धावा कुटल्या. स्टोक्सने टी-२० च्या थाटात फटकेबाजी करीत अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि तीन षटकार खेचले. कर्णधार ज्यो रुटसोबत त्याने ४३ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली. रुटने ३३ चेंडूत २२ धावा केल्या. यानंतर स्टोक्सने ओली पोप(नाबाद १२)सोबत संघाच्या ३०० धावा फळ्यावर लावल्या. इंग्लंडने ही कसोटी जिंकल्यास मालिका १-१ अशी बरोबरीत होइल. तिसरा आण निर्णायक सामना येथेच २४ जुलैपासून रंगणार आहे.(वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : पहिला डाव ९ बाद ४६९ आणि दुसरा डाव ३ बाद १२९ वर घोषित (बेन स्टोक्स नाबाद ७८, अली पोप नाबाद १२, ज्यो रुट २२, क्राऊले ११)

वेस्ट इंडिज : पहिला डाव : सर्व बाद २८७, दुसरा डाव (लक्ष्य ८५ षटकात ३१२) : ३७ षटकात ४ बाद १०८ (जॉन कॅम्पबेल ४, क्रेग ब्रेथवेट १२, शाय होप ७).गोलंदाजी : स्टुअर्ट ब्रॉड ३/२५,ख्रिस व्होक्स १/२६.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज