Join us  

IND vs ENG : पहिल्या कसोटीत १३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांना इंग्लंडनं दिली विश्रांती, दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ( India vs England, 2nd Test ) इंग्लंड संघानं शुक्रवारी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 4:01 PM

Open in App

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ( India vs England, 2nd Test ) इंग्लंड संघानं शुक्रवारी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडनं संघात चार बदल केले असून त्यामध्ये पहिल्या कसोटीत १३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांना विश्रांती दिल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चार खेळाडूंमध्ये प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसनचेही ( James Anderson) नाव आहे. त्याच्या व्यतिरिक्त जोफ्रा आर्चर ( Jofra Archer), फिरकीपटू डॉम बेस ( Dom Bess) आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर यांनाही विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) आणि मोईन अली (Moeen Ali) यांच्यासह पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास

कर्णधार जो रुटच्या ( Joe Root) दमदार द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड १-० अशा आघाडीवर आहे. त्यात त्यांनी दुसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आर्चरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे, तर बटलर मायदेशी परतणार आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता इंग्लंड क्रिकेट बोर्डानं रोटेशन पॉलिसी अवलंबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत विकेट घेतल्यानंतरही अँडरसन व बेस यांना आराम दिला गेला आहे. पहिल्या कसोटीत आर्चरनं ३, अँडरसननं ५ आणि बेसनं ५ विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

संघात अष्टपैलू खेळाडूंची फौजइंग्लंडनं जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू खेळाडूंची फौज दिसत आहे. मोईन अली व ख्रिस बोस्क यांच्यासह ५०० विकेट्स घेणारा स्टुअर्ट ब्रॉडही दमदार फलंदाजी करतो. बेन स्टोक्स संघात आहेच.   IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

इंग्लंडनं जाहीर केला १२ सदस्यीय संघ; जेम्स अँडरसनला विश्रांती

  • IN: बेन फोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स
  • OUT: जोस बटलर, डॉम बेस, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर

 

इंग्लंडचा संघ - जो रुट ( कर्णधार, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, बेन फोक्स ( यष्टिरक्षक), डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनजोफ्रा आर्चरस्टुअर्ट ब्रॉड