Join us

लेस्बियन क्रिकेटर सारा टेलर बनली 'आई', तिच्या समलैंगी पार्टनरने मुलाला दिला जन्म

इंग्लंडच्या महिला संघाची माजी खेळाडू सारा टेलरच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:46 IST

Open in App

sarah taylor cricketer : इंग्लंडच्यामहिला संघाची माजी खेळाडू सारा टेलरच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. साराची लेस्बियन पार्टनर डायना हिने एका मुलाला जन्म दिला आहे. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांनी ही माहिती दिली. 

साराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "या लहानग्यासोबत हा आठवडा. लॉरी तुझे या जगात स्वागत आहे. डायना आणि हा नवा पाहुणा दोघे माझे जग आहात." या पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्टार भारतीय महिला क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्जने सारा टेलरचे अभिनंदन केले आहे.

सारा टेलर बनली आईमहिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये सारा टेलरचे नाव घेतले जाते. तिने सप्टेंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यापूर्वी तिने मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे मार्च २०१६ मध्ये क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. पण नंतर २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ती इंग्लंडच्या संघाचा भाग होती.

३४ वर्षीय सारा टेलरने २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ४९.५० च्या सरासरीने ३९६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील १४७ आणि उपांत्य फेरीतील ५४ धावा ही तिची खेळी आजतागायत चाहत्यांच्या मनात ताजी आहे. लक्षणीय बाब म्हणजे फायनलमध्ये भारताविरुद्धच्या ४५ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला विश्वविजेते बनवण्यात मदत झाली. लंडनमध्ये जन्मलेली ही महिला क्रिकेटपटू तीन विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होती. २००९, २०१७ मध्ये वन डे विश्वचषक आणि २००९ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक संघाची ती भाग होती. तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २२६ सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

  

टॅग्स :इंग्लंडप्रेग्नंसीमहिलाऑफ द फिल्ड
Open in App