Join us  

इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील आक्रमता अखेर दाखवून दिली; संघ संयोजनावर फेरविचार होणे गरजेचे

कोणत्याही खेळपट्टीवर ३३६ धावा भरपूर झाल्या. ऋषभ पंतने निर्णायक खेळी करीत धावसंख्येला आकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:52 AM

Open in App

व्हीव्हीएस लक्ष्मण

इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील आक्रमता अखेर दाखवून दिली. भारतावरील शुक्रवारचा विजय हा चांगलाच वर्चस्वपूर्ण होता. त्याआधी पहिला सामना गमाविल्यानंतर कर्णधार इयोन मॉर्गनने सांगितलेच होते की, आमचा संघ आक्रमक पद्धतीने खेळणे थांबविणार नाही. याच आक्रमकतेच्या बळावर संघाने विश्वचषक जिंकला शिवाय आयसीसी रॅंकिंगमध्ये अव्वलस्थानावर झेपदेखील घेतली. दुर्दैवाने मॉर्गन जखमी होऊन बाहेर पडल्यानंतरही सहकाऱ्यांनी आक्रमकता सोडली नाही. भारतीय गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडेपर्यंत व सहा गडी राखून विजय साजरा करेपर्यंत धडाका कायम राखला.

कोणत्याही खेळपट्टीवर ३३६ धावा भरपूर झाल्या. ऋषभ पंतने निर्णायक खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. राहुल, पंत आणि हार्दिक यांचा स्वत:च्या शैलीतील फटकेबाजीचा धडाका डोळे दीपवणारा होता. इंग्लिश फलंदाजांची फटकेबाजी शिखरावर असताना भारताला वेगळे काही करणे शक्य होते का? कामगिरीचा भार सोपा करणे निर्णायक मानले जाते हे मानू शकतो, पण हार्दिक तीन-चार षटके टाकू शकला असता. तो गोलंदाजी करणार नसेल तर मात्र संघ संयोजनावर विचार व्हायला हवा. कृणाल पांड्या हा नियमितपणे विशेषत: सपाट खेळपट्टीवर दहा षटके टाकू शकेल, असे मी मानत नाही.

टॅग्स :भारतइंग्लंड