Join us  

भारताची खिल्ली उडवणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराची नेटिझन्सकडून धुलाई, ऑसी कर्णधाराचीही उडी

भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात 92 धावाच करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:50 AM

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात 92 धावाच करता आल्या. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. युजवेंद्र चहलने सर्वाधिक 18 धावा केल्या. भारतीय संघातची न्यूझीलंडविरुद्धची दुसरी नीचांक खेळी ठरली. याआधी 2010 मध्ये डाम्बुल्ला येथे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 88 धावांवर तंबूत परतला होता. श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोनच संघांनी भारताला दोनवेळा शंभरीच्या आत बाद केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताच्या या लाजीरवाण्या कामगिरीची खिल्ली उडवताना एक ट्विट केले. त्यावरून नेटिझन्सनी त्याची चांगलीच धुलाई केली.

चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली. 

वॉनने ट्विट केले की,''आजच्या काळात एखादा संघ 100 धावांत बाद होतो, ही खरचं आश्चर्याची बाब आहे.'' ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉ हा मायकल वॉनच्या मदतीला धावून आला. ''अव्वल फलंदाज नसतील तर संघाची काय अवस्था होते, ते पाहा, '' असे त्याने ट्विट केले. मायकल वॉनच्या ट्विटला उत्तर देताना नेटिझन्सने त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील इंग्लंडच्या कामगिरीची आठवण करून दिली. वेस्ट इंडिजने कसोटी सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ 77 धावांवर माघारी पाठवला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडइंग्लंडवेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया