Join us  

दुसऱ्या वन-डेत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी मात

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण विश्वविजेत्या संघाचा डाव ९ बाद २३१ धावांत रोखल्या गेल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 12:23 AM

Open in App

मॅन्चेस्टर : वेगवान गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दुसºया एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण विश्वविजेत्या संघाचा डाव ९ बाद २३१ धावांत रोखल्या गेल्या.प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने ३० षटकात २ बाद १४३ धावांची मजल मारली होती. आॅस्ट्रेलियातर्फे कर्णधार अ‍ॅरोन फिंच (७३) व मार्नस लाबुशेन (४८) यांनी तिसºया विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. एकवेळ आॅस्ट्रेलियाची ६ बाद १४७ अशी स्थिती होती त्यानंतर ती ८ बाद १६६ अशी झाली. आॅस्ट्रेलियाचा डाव ४८.४ षटकांत २०७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्सने ३२, जोफ्रा आर्चरने ३४ व सॅम कुरेनने ३५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सातव्या षटकात दोन्ही सलामीवीर जॉनी बेयरस्टॉ (०) व जेसन रॉय (२१) तंबूत परतले होते. अ‍ॅडम झम्पाने (३-३६) अनुभवी जो रुट (३९), कर्णधार इयोन मॉर्गन (४२) व गेल्या लढतीत शतकी खेळी करणाºया सॅम बिलिंग्स (८) यांना बाद केले.तळाच्या फळीतील फलंदाज ख्रिस व्होक्स (२६), टॉम कुरेन (३७) व आदिल राशिद (नाबाद ३५) यांनी यजमान इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. टॉम कुरेन व राशिद यांनी नवव्या विकेटसाठी ७६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे झजम्पा व्यतिरिक्त मिशेल स्टार्कने ३८ धावांत दोन बळी घेतले. जोश हेजलवुडने (१-२७) नियंत्रित मारा केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंड