Join us

इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी

इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद गुरुवारी अनुभवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:51 IST

Open in App

लंडन : इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद गुरुवारी अनुभवला. सरे क्लबच्या या खेळाडूने लॅंशायर क्लबविरुद्ध दुबेत खेळवलेल्या T10 लीगच्या प्रदर्शनीय सामन्यात त्याने ही फटकेबाजी केली. जॅकने सलामीला येताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली.

त्याने स्टीफन पॅरीच्या एका षटकात सहा षटकार खेचले. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर पाच षटकांत ९८ धावा चोपल्या. ९८ धावांवर असताना तो थोडक्यात बचावला. त्याने ३० चेंडूत १०५ धावांची खेळी केली. सरेने दहा षटकात ३ बाद १७६ धावा केल्या. 

पाहा व्हीडिओ

लॅंकशायरचा संपूर्ण संघ ९.३ षटकांत ८१ धावांवर तंबूत परतला.

टॅग्स :इंग्लंड