Join us

PAK vs ENG : १७ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात आला अन् पाहायला मिळाले रस्त्यावरील 'खड्डे'; Video Viral

England tour to Pakistan : जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:49 IST

Open in App

England tour to Pakistan : जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. २० सप्टेंबरपासून कराचीच्या नॅशनल स्टेडियमवरून या मालिकेला सुरुवात होणार आहे. १७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. ७ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिके शिवाय ३ कसोटीही खेळल्या जाणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर डिसेंबर महिन्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.  

इंग्लंडने मागील वर्षी सुरक्षेचं कारण देताना पाकिस्तान दौरा स्थगित केला होता. पण, अखेर इंग्लंडचा संघ दाखल झाला. त्यांच्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व सरकारने सुरक्षारक्षकांचा फौजफाटाच तयार ठेवला होता. पण, एका गोष्टीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. विमानतळ ते हॉटेल या मार्गावरील खड्ड्यांमधून इंग्लंडच्या संघाला प्रवास करावा लागला. पाकिस्तानच्या पत्रकारानेच त्यांचे जाहीर वाभाडे काढून रस्त्यांवरील खड्ड्यांचा व्हिडीओ पोस्ट केला.   

पाकिस्तान-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • २० सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-२०, कराची
  • २२ सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-२०, कराची
  • २३ सप्टेंबर- तिसरी ट्वेंटी-२०, कराची
  • २५ सप्टेंबर- चौथी ट्वेंटी-२०, कराची
  • २८ सप्टेंबर- पाचवी ट्वेंटी-२०, लाहोर
  • ३० सप्टेंबर- सहावी ट्वेंटी-२०, लाहोर
  • २ ऑक्टोबर - सातवी ट्वेंटी-२०, लाहोर
टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड
Open in App