Join us

IPL 2020 : ख्रिस वोक्सची माघार; Delhi Capitals संघाला मोठा धक्का

दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी १.५ कोटी मोजले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:56 IST

Open in App

आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला आहे.

इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने आयपीएलमधून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी १.५ कोटी मोजले आहेत. इंग्लिश समरसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून अजून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.

टॅग्स :आयपीएल 2020इंग्लंड