Join us

ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर

एवढं सगळं घडल्यावर ती पुन्हा मैदानात उतरली, पण..  इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 22:42 IST

Open in App

ENG W vs SL W  Chamari Athapaththu Stretchered Off After Brutal Injury : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्या दरम्यान मैदानात धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. इंग्लंडच्या संघाने दिलेल्या २५४ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकन सलामीची बॅटर आणि कर्णधार चामरी अटापट्टू आणि हसिनी परेरा यांनी संघाच्या डावाची सुरुवात केली. अवघ्या पाच षटकानंतर श्रीलंकन कॅप्टनवर स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ आली. तिला स्ट्रेचरवरुन बाहेर नेतानाचा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 एक धाव घेतली अन् ती स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेली

इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अटापट्टूवर मोठी जबाबदारी होती. तिने परेराच्या साथीनं संयमी सुरुवात केली. श्रीलंकेच्या डावातील ५ षटकानंतर दोघींनी धावफलकावर १७ धावा लावल्या होत्या.  सहाव्या षकातील दोन चेंडू निर्धाव खेळून काढल्यावर चामरीनं तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली अन् ती पायात क्रँम्प आल्याने वेदननं व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळाले. वेदाना इतक्या असह्य होत्या की, तिला उभा राहणेही अशक्य झाले होते. फिजिओ मैदानात आले. तिला चालणंही शक्य नसल्यामुळे शेवटी श्रीलंकन कर्णधाराला स्ट्रेचरवरूनड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आले.

पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी

एवढं सगळं घडल्यावर ती पुन्हा मैदानात उतरली, पण..  

चामरी अटापट्टू ही श्रीलंकन संघाची फक्त कॅप्टनच नाही तर ती या संघाचा कणा आहे. श्रीलंकेचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असताना ऑलराउंडर कॅप्टनच्या दुखापतीमुळे त्यात आणखी भर पडली. चमारीनं १७ चेंडूचा सामना करून ६ धावा करत मैदान सोडलं त्यावेळी श्रीलंकेच्या धावफलकावर १८ धावा होत्या. तिची जागा घेण्यासाठी आलेली विश्मी गुणरत्ने फक्त १० धावा करून परतली. परेरा आणि हर्षिथा या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी  ५८ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण ९८ धावांवर ही जोडी फुटली. २३ व्या षटकात चामरी अटापट्टू पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण ती क्षमतेनुसार कामगिरी करु शकली नाही. सोफी एसलस्टोन हिने तिला १५ धावांवर बोल्ड केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chamari Athapaththu stretchered off field during England vs. Sri Lanka match

Web Summary : Sri Lankan captain Chamari Athapaththu was stretchered off the field due to a leg injury during the match against England. She returned later but was dismissed for 15, after scoring 6 runs initially. Sri Lanka lost the match despite a partnership.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५श्रीलंकाइंग्लंड