ICC Womens World Cup 2025 ENG W vs SL 12th Match England Women Won By 89 Runs Against Sri Lanka Women : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील बाराव्या सामन्यात इंग्लंडच्या संघासमोर भारतासह संयुक्त यजमानपद मिरवणाऱ्या श्रीलंकेला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या संघाने विजयाच्या हॅटट्रिकसह ६ गुण आपल्या खात्यात जमा करत गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. या सामन्यात इंग्लंडकडून नॅटली सायव्हर ब्रंट हिने आधी शतकी खेळीनंतर गोलंदाजीतही खास छाप सोडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नॅटलीचं दमदार सेंच्युरी; लंकेकडून गोलंदाजीत रणवीरा ठरली भारी
पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने एमी जोन्स ११ (१३), टॅमी ब्युमाँट (३२) आणि हेदर नाइट २९ (४७) अल्प खेळी करून परतल्यावर नॅटली सायव्हर ब्रंटनं आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवून दिली. तिने ११७ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २५३ धावांपर्यंत मजल मारली होती. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय उदेशिका प्रभोदिनी आणि सुगंदिका कुमारी यांनी प्रत्येकी २-२ विकेट् आपल्या खात्यात जमा केल्या. काविशा दिल्लारी हिने १ विकेट मिळवली.
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
लंकेनं चांगली सुरुवात केली, पण ...
श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चामीरा अटापट्टूच्या दुखापतीमुळे श्रीलंकन संघाला मोठा फटका बसला. ती मैदान सोडून गेल्यावर पुन्हा बॅटिंग करायला आली. पण फक्त १५ धावांवरच मॅचविनरचा खेळ खल्लास झाला. तिच्या साथीनं लंकेच्या डावाची सुरुवात करणाऱ्या हसिनी परेरानं ६० चेंडूत संयमी ३५ धावा केल्या. हीलंकेच्या ताफ्यातून कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली. तिच्याशिवाय हर्षिताने ३७ चेंडूत केलेल्या ३३ धावा वगळता अन्य कुणाचाही निभाव लागला नाही. परिणामी श्रीलंकाच संघ २६ व्या षटकातील चौथ्या चेंडूव १६४ धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून सोफी एसलस्टोन हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. चार्ली डीन आणि नॅटलीनं प्रत्येकी २-२ तर ॲलिस कॅप्सी आणि लिन्से स्मिथ यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे जमा केली.
गुण तालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?
श्रीलंकेच्या संघाचा सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला. सलामीच्या लढतीत भारतीय महिला संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे मिळालेल्या एका गुणासह ते गुणतालिकेत फक्त पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहेत. इंग्लंडसह (६ गुण) ऑस्ट्रेलिया (५ गुण), भारत (३ सामने ४ गुण) आणि दक्षिण आफ्रिका (३ सामने ४ गुण) संघ टॉप ४ मध्ये आहेत. न्यूझीलंड (३ सामने २ गुण), बांगलादेश (३ सामने २ गुण ), श्रीलंका (३ सामने १ गुण) आणि पाकिस्तान (३ सामने ० गुण) अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.