South Africa Women Crush England Women By 125 Runs To Reach Maiden World Cup Final : गुवाहटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर रंगेलेल्या पहिल्या सेमीफायनल लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या इंग्लंडचा धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार लॉराच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ३१९ धावा करत इंग्लंडच्या संघासमोर ३२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४२ व्या षटकात १९४ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १२५ धावांनी सामना जिंकत पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल गाठली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आघाडीच्या फळीतील तिघींच्या पदरी भोपळा
१४३ चेंडूतील १६९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउट्समधील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारत इंग्लंडसमोर तगडे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्याही होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील तिघींना खातेही उघडता आले नाही. एमी, टॅमी आणि हिदर शून्यावर माघारी परतली अन् इंग्लंडचा संघ संकटात सापडला.
हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर
दोघींनी अर्धशतके झळकावली, पण..
खराब सुरुवातीनंतर इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हिने ७६ चेंडूत केलेल्या ६४ धावा आणि एलिसी कॅप्सीनं ७१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता इंग्लंडच्या एकाही बॅटरला मैदानात तग धरता ला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेनं सेट केलेल्या विक्रमी धावसंख्येंचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघ २०० धावांच्या आत आटोपला. इंग्लंड वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरा यशस्वी संघ आहे. त्यांचा प्रवास संपुष्टात आल्यामुळे आता यंदाच्या हंगामात नवा विजेता मिळण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीनंतर मिळणार दुसरा फायनलिस्ट
३० नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रलिया यांच्यात सामना रंगणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवरील सामन्यात विजेत्या संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यंदाच्या हंगामातील जेतेपदासाठी भिडेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तगड्या इंग्लंडला शह दिल्यावर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला धक्का देत फायनल गाठणार का? ते पाहण्याजोगे असेल.