ENG W vs SA W 1st Semi Final Laura Wolvaardt Century : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. गुवाहटीच्या बरसापाराच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर लॉरानं ब्रिट्सच्या साथीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. संघाचं फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी कॅप्टन्सीला साजेसा खेळ करताना तिने वनडे कारकिर्दीतील दहावे शतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या लॉराचा शतकी तोरा; असा पराक्रम करणारी ठरली पहिली
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या भात्यातून आलेली ही पहिली सेंच्युरी ठरली. या खेळीसह तिने सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हिच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. एवढेच नाही तर स्मृती मानधना, सुझी बेट्स आणि टॅमी ब्यूमॉन्ट यांच्या नंतर ती महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या रुपात १० पेक्षा अधिक शतके झळकवणारी ती चौथी बॅटर ठरली आहे.
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
- महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
- १५ - मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
- १४ - स्मृती मंधाना (भारत)
- १३ - सुझी बेट्स (न्यूझीलंड)
- १२ - टॅमी ब्यूमॉन्ट (इंग्लंड)
- १० - नॅट स्किव्हर-ब्रंट (इंग्लंड)
- १० - लॉरा वॉल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका)*
५००० धावांचा टप्पा पार करणारी दक्षिण आफ्रिकेची पहिली बॅटर
सेमीफायनलमध्ये शतकी डाव साधण्याआधी तिने महिला वनडेत ५००० धावांचा टप्पा पार करण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात ४८ धावा पूर्ण करताच वनडेत ५००० धावा करणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली महिला खेळाडू ठरली. महिला वनडेत हा पल्ला गाठणारी ती सहावी बॅटर आहे.
मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी
लॉरानं महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत भारताच्या मिताली राजची बरोबरी केली आहे. भारताची माजी कर्णधार मितालीनं ३६ डावात १३ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. लॉरानं अवघ्या २३ डावात वर्ल्ड कप स्पर्धेत १३ वेळा हा डाव साधला आहे.
महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५०+ धावांच्या खेळी
- १३ - मिताली राज (३६ डाव)
- १३ - लॉरा वॉल्व्हार्ड (२३ डाव)*
- १२ - डेबी हॉकलि (४३ डाव)
- ११ - शार्लट एडवर्ड्स (२८ डाव)