Join us

रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा

अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला रिषभ पंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:09 IST

Open in App

ENG vs IND Rishab Pant Record With Second Century In 1st Test : लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात भारतीय विकेट किपर बॅटर आणि भारतीय संघाचा उप कर्णधार रिषभ पंत याने नवा इतिहास रचला आहे. पहिल्या डावातील शतकी खेळीनंतर त्याने दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह पंतनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडच्या मैदानात एका डावात दोन शतके झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने पहिल्या डावातील शतकी खेळीसह महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गावसकरांनी केली कोलांटी उडी मारण्याची डिमांड, पण...

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील चुकीच्या फटक्यावर कानउघडणी करताना 'स्टुपिड' असा उल्लेख करत पंतला डोस देणाऱ्या लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही हेडिंग्लेच्या मैदानात पंतच्या दुसऱ्या ऐतिहासिक शतकी खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर गावसकरांनी हातवारे करत कोलांडी उडी मारून शतकी खेळीच सेलिब्रेशन कर असा इशाराही पंतला केला. पंतनेही त्यांना नोटीस केले. पण पुढच्या वेळी करेन, असे म्हणत त्याने यावेळी पहिल्या शतकानंतर केलेले सेलिब्रेशन करणं टाळल्याचे दिसून आले. 

KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पहिल्या डावातील तोरा दुसऱ्या डावातही कायम!

रिषभ पंतनं पहिल्या डावात १७८ चेंडूत १३४ धावांची जबरदस्त खेळी केली होती. दुसऱ्या डावातही त्याने आपला तोरा कायम ठेवला. नव्वदीच्या घरात पोहचल्यावरही रिषभ पंत मोठे फटकेबाजी करताना दिसून येते. पहिले शतक साजरे करताना त्याने षटकार मारला होता. त्यानंतर  कोलांटी उडी मारत त्याने खास आपल्या अंदाजात या शतकाचे सलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी त्याने शतक साजरे करण्यासाठी वेळ घेतला. 

पंतची केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी

शतक साजरे केल्यावर मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने १४० चेंडूत त्याने ११८ धावांची दमदार खेळी करत यजमान इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्याचे मोठे काम नक्कीच केले आहे. शुबमन गिलच्या रुपात भारतीय संघाने चौथ्या दिवसातील पहिल्याच सत्रात तिसरी विकेट गमावली होती. धावफलकावर ९२ धावा असताना रिषभ पंत मैदानात आला. त्याने केएल राहुलसोबत १९५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंत