इंग्लंड-भारत यांच्यातील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात निराश केले. यशस्वी जैस्वाल या सर्वाधिक कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले. झेलची संधी गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाचाही समावेश होता. एका बाजूला भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणाची चर्चा रंगत असताना तिसऱ्या दिवसातील खेळातील दुसऱ्या सत्रात जड्डू आणि साई सुदर्शन यांच्या रिले कॅचनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जेमी स्मिथ ४० धावांवर झेलबाद झाला. हा झेल कायद्यात राहून फायद्यात हे दृश्य दाखवून देणारा होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डू-साई सुदर्शन यांच्यात कमालीचा ताळमेळ; रिले कॅचसह जेमी स्मिथचा खेळ खल्लास
इग्लंडच्या डावातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात बेन स्टोक्स स्वस्तात तंबूत परतल्यावर मैदानात उतरलेल्या जेम स्मिथनं हॅरी ब्रुकला उत्तम साथ देत अप्रतिम खेळी केली. तो अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करत होता. प्रसिद्ध कृष्णानं टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जेम स्मिथनं पुल शॉट खेळला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हवेत मारलेला हा फटका इंग्लंड बॅटरच्या खात्यात बाउंड्री जमा करुन जाईल, असे वाटत होते. पण रवींद्र जडेजाने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. सीमारेषेवर त्याने कमालीच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून दिला. साई सुदर्शनसह उत्तम रिले कॅचसह जेमी स्मिथच्या इंनिंगला ब्रेक लावला.
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
बाउंड्री लाइनवरील कॅचसंदर्भातील नवा नियम
क्रिकेटच्या नियमात वेळोवेळी बदल होत असतात. नुकतेच सीमारेषेवरील झेल संदर्भातील नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, फक्त झेल पूर्ण करतानाच नव्हे तर सीमारेषेबाहेर जाणारा चेंडूला हाताचा स्पर्श होईल त्यावेळी खेळाडूचा सीमारेषेच्या आत असला पाहिजे. याचा अर्थ हवेत उडी मारून चेंडू मैदानात फेकला गेला तर तो झेल मानला जाणार नाही. जड्डू आणि साईनं अगदी या नियम पाळत कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: ENG vs IND Ravindra Jadeja Sai Sudharsan Combine For Brilliant Boundary Relay Catch To Get Much Needed Wicket Watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.